परमबीर सिंग यांचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप : मुंबईतील पाच बार मालकांना ईडीचे समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीनेही तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वीच ईडीने गुन्हा नोंदवून अनिल देशमुख यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर आता मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आलं आहे.

    राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीनेही तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वीच ईडीने गुन्हा नोंदवून अनिल देशमुख यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर आता मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आलं आहे.

    याप्रकरणात ईडीने अंधेरीतील एका बार मालकाची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बार मालक सचिन वाझेंना सेवेत असताना महिन्याला अडीच लाख रुपये द्यायचा. नंतर वाझेंना मार्च महिन्यात अटक करण्यात आली आणि नंतर बडतर्फही करण्यात आलं.याची माहिती वाझे थेट तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना देत होते, अशीही माहिती आता समोर आली आहे.