मुलीला लसीकरणासाठी अमेरिकेत जाण्याची परवानगी द्या, उच्च न्यायालयात पालकांची याचिका – उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे दिले निर्देश

कोरोना(Corona) महामारीविरोधात भारतात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणास(Vaccination) सुरूवात केली आहे. मात्र, अमेरिकेत १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना अमेरिकेत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

    मुंबई:आपली मुलगी ही अमेरिकेची(america) नागरिक असून तिला कोरोना प्रतिबंधिक लस घेण्यासाठी अमेरिकेत जाण्याची परवानगी(Permission to Got in USA) द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

    दक्षिण मुंबईत राहणाऱ्या विरल आणि बिजल ठक्कर दांपत्याची १४ वर्षांची मुलगी सौम्या हिच्याकडे भारतीय आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व (ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड) आहे. कोरोना महामारीविरोधात भारतात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणास सुरूवात केली आहे. मात्र, अमेरिकेत १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना अमेरिकेत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

    याचिकेत मुलीची मावशी पूर्वी पारेख ही सह-याचिकाकर्ती आहे, तसेच ती मुलीची कायदेशीर पालक (गार्डीयन) असणार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या मुलीला अमेरिकेत जाऊन लसीकरण करण्यास आणि मुलीची गार्डीयन म्हणून मावशीला तिच्यासोबत जाण्यास कायदेशीररित्या परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ठक्कर कुटुंबियांच्यावतीने वकील मिलिंद साठे यांनी दाखल केली आहे. त्यावर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी व्हीसामार्फत सुनावणी पार पडली.

    या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे नाहीत. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी केंद्र सरकार आणि अमेरिकन दूतावासाला याचिकेत प्रतिवादी करावे अशी बाजू राज्याच्या वतीने वकील पौर्णिमा कंथारिया यांनी खंडपीठासमोर मांडली. केंद्र सरकारला यात प्रतिवादी करता येईल, मात्र नियमावलीनुसार अमेरिकन दूतावासाला सदर याचिकेत प्रतिवादी करता येणर नाही अशी बाजू वकील साठे यांनी मांडली. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने राज्य सरकारला आठ़वड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.