परळी सुन्न, राज्याची मान खाली गेली; करूणा शर्मा प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या व्टिटने खळबळ

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकरा परिषद घेण्यासाठी परळीत रविवारी दाखल झालेल्या करुणा शर्मा- मुंडे याना नाट्यमय पध्दतीने अटक झाल्यानंतर राज्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या साऱ्या प्रकरणावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यानी निपक्ष आणि दबावाशिवाय चौकशीची मागणी केली असतनाच माजी मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी भाजपच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांनी कोणाचेही नाव न घेता, “परळी सुन्न आहे. मान खाली गेली आहे राज्याची” असे म्हणत व्टिट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकरा परिषद घेण्यासाठी परळीत रविवारी दाखल झालेल्या करुणा शर्मा- मुंडे याना नाट्यमय पध्दतीने अटक झाल्यानंतर राज्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या साऱ्या प्रकरणावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यानी निपक्ष आणि दबावाशिवाय चौकशीची मागणी केली असतनाच माजी मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी भाजपच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांनी कोणाचेही नाव न घेता, “परळी सुन्न आहे. मान खाली गेली आहे राज्याची” असे म्हणत व्टिट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी व्टिट करत सरकार आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे.

    ॲट्रॉसिटी, चाकूहल्ला गुन्हेही दाखल

    करूणा शर्मा यांनी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचे पुरावे देणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, त्या परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या, मात्र पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान गाडीत काहीतरी ठेवले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतरही त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी, चाकूहल्ला असे गुन्हेही दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

    परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची

    या साऱ्या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्टिट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong presidents hould not be set! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!”