मुंबईतील वांद्रे परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू,७ जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    मुंबई : मुंबईतील वांद्र परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला.

    दरम्यान या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस उपस्थित आहेत. या अपघातानंतर अग्निशमन दलाचे जवान ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकलेले नाही ना याची खातरजमा केली जात आहे. जिथे घराचा भाग कोसळला ती जागा अतिशय चिंचोळी आहे.

    दुर्घटना घडली त्यावेळी मुंबईत जोरदार पाऊसही बरसत होता. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना ढिगारा हटवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातानंतर परिसराचे आमदार झिशान सिद्दीकी पोहोचले. त्यांच्या माहितीनुसार, “जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एका तरुणाचा यात मृत्यू झाला.

    तसेचं ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलेले तर नाही ना हे याचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.” दरम्यान पाऊस सुरु असल्याने आणखी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.