मुंबईतील डोंगरी येथील बहुमजली इमारतीचा भाग कोसळला, ६ नागरिकांना वाचवण्यात यश

मुंबईतील डोंगरी परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर २ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर इमारत ही जुनी होती. आठ मजली निवासी इमारतीचा मागील भाग कोसळल्यानंतर एक बाई अडकल्याची शक्यता एका नागरी अधिकाऱ्याने वर्तवली.

मुंबई : मुंबईतील ८ मजली इमारीतीच्या ३ ऱ्या आणि ७व्या मजल्यावरील काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि.२ सप्टेंबर २०२०) सकाळी कोसळला (collapsed) होता. शहरातील डोंगरी परिसरातील रत्नदीप बारजवळ एसटी बिल्डिंग (building) चौकाजवळ ही घटना घडली आहे.

घटना स्थळी अग्नि शमन दलाने तात्काळ धाव घेतली होती. अग्निशमन दलाने केलेल्या बचाव कार्यात ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. (6 people rescued) त्यामुळे इमारत कोसळल्याच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह, पोलिस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटना स्थळी दाखल झाले होते. तसेच बचाव कार्य आणि शोधकार्य लगेच सुरु करण्यात आले.

मुंबईतील डोंगरी परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर २ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर इमारत ही जुनी होती. आठ मजली निवासी इमारतीचा मागील भाग कोसळल्यानंतर एक बाई अडकल्याची शक्यता एका नागरी अधिकाऱ्याने वर्तवली.

तसेच मंगळवारी रात्री नालासोपारा येथील अचोले भागात ४ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीमधील नागरिकांना इमारत हलत असल्याचा भास झाल्यास तात्काळ इमारती बाहेर निघाले. त्यामुळे तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान इमारत कोसळल्याचा पंचनामा अधिकारी करत आहेत.