प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

जखमी असलेले हे सर्वजण कामगार (Injured Workers) असल्याची माहिती आहे. या घटनेत अद्याप जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरु केल्याने २१ जणांचे प्राण वाचले आहेत(As many as 21 people have been rescued as firefighters rushed to the spot). दुर्घटना घडली तेव्हा कामगार पुलाच्या वर आणि खाली काम करत होते.

    मुंबई : मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra-Kurla Complex, Mumbai) परिसरात मेट्रोचा बांधकाम सुरु असलेला फ्लायओव्हर (Metro Under Construction Flyover Bridge) पहाटे चारच्या सुमारास कोसळला (Collapse). या अपघातात १४ जण जखमी झाले असून, २१ जणांना वाचविण्यात यश आले हे. जखमींना सांताक्रुझच्या व्ही एन देसाई रुग्णालयात (V N Desai Hospital, Santacruz) दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे (likely trapped under pile).

    जखमी असलेले हे सर्वजण कामगार असल्याची माहिती आहे. या घटनेत अद्याप जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरु केल्याने २१ जणांचे प्राण वाचले आहेत. दुर्घटना घडली तेव्हा कामगार पुलाच्या वर आणि खाली काम करत होते.

    दुर्घटना घडल्यानंतर पुलाच्या वर काम करत असलेल्या कामगारांनी जीव वाचवण्याचे प्रयत्न केले. काही जणांनी सळयांचा आधार घेतला तर काही जणांनी पुलावरुन उडी मारुन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

    अनिल सिंग, अरविंद सिंग, अझर अली, मुस्ताफ अली, रियाझुद्दीन, मोतलाब अली, रियाझू अली, श्रावण, अतीश अली, रलिस अली, अझिझ उल हक, परवेझ, अकबर अली, श्रीमंद अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.