ढगाळ दुपार, दमट रात्र आणि ओली सकाळ, स्वेटर इन, रेनकोट आऊट !

मुंबईकरांची पहाटच पावसाच्या शिंतोड्यांनी झाली. मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अनेक भागांत तुरळक पाऊस झाला. काही भागात केवळ पावसाचे थेंब पडले. मात्र गुरुवार दुपारपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण दिसत होतं.

डिसेंबर महिना हा खरं तर हक्काच्या थंडीचा महिना. थंडी सुरू व्हायला थोडा उशीर झाला तरी डिसेंबरमध्ये हक्काची थंडी मुंबईकर आणि महाराष्ट्रवासी अनुभवत असतात. मात्र आज (शुक्रवार) सकाळीच मुंबईकरांना स्वेटरऐवजी रेनकोट शोधण्याची गरज निर्माण झाली.

मुंबईकरांची पहाटच पावसाच्या शिंतोड्यांनी झाली. मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अनेक भागांत तुरळक पाऊस झाला. काही भागात केवळ पावसाचे थेंब पडले. मात्र गुरुवार दुपारपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण दिसत होतं.

गुरुवारपासून मुंबईतील थंडी गायब झाली होती. आकाशात ढग जमायला सुरुवात झाल्यामुळं हवेतील आर्द्रता वाढत होती. थंडीचं प्रमाण कमी होऊन दुपारच्या वेळी मुंबईकर घामाघुम होत असल्याचं चित्र होतं. शुक्रवारी सकाळी सकाळीच मुंबईतील अनेक भागांत पावसानं हजेरी लावली.

मुंबईतील दादर, माटुंगा, माहिम, प्रभादेवी या भागात पाऊस पडला. ठाण्यातील काही भागात तसेच डोंबिवली आणि कल्याणमध्येही पावसाने तुरळक शिडकावा केला. यामुळे सकाळी सकाळी कामावर चाललेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. मुंबईसह अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने अगोदरच वर्तवली होती.