मेन आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांची सुटका, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक आणि पावसाचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.१९ या वेळेत वाशी / नेरूळ / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि पनवेल / नेरूळ / वाशी येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप सेवा ब्लॉक कालावधी दरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.

  मुंबई : मध्य रेल्वेतर्फे देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी ट्रान्सहार्बर व हार्बर उपनगरी मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  ठाणे-वाशी / नेरूळ / पनवेल अप व डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान

  ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.१९ या वेळेत वाशी / नेरूळ / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि पनवेल / नेरूळ / वाशी येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप सेवा ब्लॉक कालावधी दरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर

  सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान आणि

  चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर

  सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान

  सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ दरम्यान वांद्रे / गोरेगाव साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेल / बेलापूर / वाशी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ दरम्यान गोरेगाव / वांद्रे येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

  मेन लाइन Main Line

  मेन लाइनवर कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही

  तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

  ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्सहार्बर मार्ग आणि हार्बर मार्गाच्या प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

  पश्चिम लाइन Western Line

  पश्चिम लाइनवर कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही

  Passenger Relief on Main and Western routes megablocks today on Transharbour and Harbor routes