एसटीला प्रवाशांची प्रतीक्षा, गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या गाडय़ांना अल्प प्रतिसाद

गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध केलेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. चार दिवसांत मुंबई व ठाण्याच्या विविध आगारातील अवघ्या दहा एसटी पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. पालघरमधून एकाही गाडीचे आरक्षण झालेले नाही. येत्या १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून कोकणासाठी २,२०० गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

    मुंबई : गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध केलेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. चार दिवसांत मुंबई व ठाण्याच्या विविध आगारातील अवघ्या दहा एसटी पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. पालघरमधून एकाही गाडीचे आरक्षण झालेले नाही. येत्या १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून कोकणासाठी २,२०० गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

    दरम्यान यात साधारण ८०० ते ९०० गाडय़ा मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणासाठी जातील. तर १,२०० ते १,३०० गाडय़ा कोकणातून मुंबईत येतील. मुंबईतून जाणाऱ्या व येणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण १६ जुलैपासून सुरू झाले आहे. गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान जादा गाडय़ांचा प्रवास सुरू राहील. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या गाडय़ा कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील.

    एकूण बसगाडय़ांपैकी पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, पालघर विभागातील आगारातून ५८८ गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यात मुंबईतील आगारातून १५० गाडय़ा आरक्षणासाठी उपलब्ध के ल्या आहेत. सध्या करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि पुन्हा नियमांचा ससेमिरा असण्याच्या शक्यतेने यंदा गणेशोत्सवाला जाणाऱ्या गाडय़ांना सुरुवातीपासून कमी प्रतिसाद मिळत असेल असा अंदाज एसटी महामंडळाकडून व्यक्त केला जात आहे.

    गट आरक्षणाला सुरुवात नाही

    एसटी महामंडळाकडून गट आरक्षणासाठी बस उपलब्ध के ल्या नाहीत. विविध प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींकडून गट आरक्षणासाठी ३०० हून अधिक अर्ज आले आहेत. परंतु याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले. २०१९ मध्ये गट आरक्षणाच्या १,२६७ गाडय़ा फु ल्ल झाल्या होत्या. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी ७२ विशेष गाडय़ांची घोषणा के ली आहे. या गाडय़ांच्या विविध श्रेणींना प्रतीक्षा यादी येत आहे. रेल्वेसाठी प्रतीक्षा यादी असतानाच एसटीला मात्र प्रवाशांची प्रतीक्षा आहे.