apex hospital

मुंबईत खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा फटका कोरोना रुग्णांनाही बसला. मुलुंडमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एका रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले.

मुंबईतील मुलुंडमध्ये असणाऱ्या (Apex Hospital) लागलेल्या आगीत (Fire) एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सोमवारी संध्याकाळी अपेक्स हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. या ठिकाणी कोरोनाचे 40 रुग्ण (40 Corona Patients) दाखल होते. या रुग्णांना तातडीनं नजीकच्या इस्पितळांमध्ये हलवण्यात आलं. यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आले होते. त्यातील एका रुग्णाचा या दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेकडून (BMC) देण्यात आली आहे.

      मुंबईत सोमवारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरची सोय करण्यात आली होती. दिवसभर या जनरेटरच्या आधारे इस्पितळातील सुविधा सुरू होत्या. जनरेटर प्रमाणापेक्षा अधिक तापल्यामुळे त्यात बिघाड झाला आणि संध्याकाळी शॉर्ट सर्किट झाले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये अचानक धावपळ सुरू झाली. रुग्णांना तातडीने इतर इस्पितळांत हलवण्यात आलं.