धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात; दिवसभरात फक्त तीन नवीन रुग्ण सापडले

धारावीसारख्या गजबजलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेची धावपळ उडाली. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजना व नियमांची कडक अंमलबजावणीमुळे येथील आता रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. धारावीत दिवसभर तीन रुग्ण आढळले असून येथील सक्रीय रुग्णांची संख्या ६२ वर आली आहे.

    मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात फक्त तीन नवीन रुग्ण आढळले. येथील सक्रीय रुग्णांची संख्याही ६२ वर आली आली आहे. घटलेल्या रुग्णसंख्यमुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    कोरोनाच्या दुस-या लाटेत मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. धारावीसारख्या विस्तिर्ण दाटीवाटीच्या झोपडपट्टीतही रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. धारावीसह शेजारच्य़ा दादर, माहिममध्येही रुग्णसंख्या वाढली होती. रोज या तिन्ही विभागातील रोजची आकडेवारी साडेतिनशे ते पावणेचारशेवर पोहचली होती.

    धारावीसारख्या गजबजलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेची धावपळ उडाली. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजना व नियमांची कडक अंमलबजावणीमुळे येथील आता रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. धारावीत दिवसभर तीन रुग्ण आढळले असून येथील सक्रीय रुग्णांची संख्या ६२ वर आली आहे.

    तर, दादरमध्ये १५ नवीन रुग्ण सापडले असून येथे २३० सक्रीय रुग्ण आहेत. माहिममध्ये दिवसभरात १९ रुग्णांची नोंद झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या २५९ वर गेली आहे. या सर्व रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.