sharad pwar

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेवून सुमारे तीन तास चर्चा केली. या चर्चेनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जोर का झटका धीरेसे देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने रणनिती तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या यशामागे प्रशांत किशोर यांची रणनीती होती. त्यानंतर त्यांनी या कामातून संन्यास घेण्याची घोषणा केली असली तरी येत्या काही महिन्यात उत्तर प्रदेश, पंजाब गोवा या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकात बंगाल किंवा महाराष्ट्र फॉर्म्युला वापरून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले तर लोकसभा जिंकणे सुकर होवू शकेल असा कयास लावला जात आहे.

  मुंबई (किशोर आपटे): निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेवून सुमारे तीन तास चर्चा केली. या चर्चेनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जोर का झटका धीरेसे देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने रणनिती तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या यशामागे प्रशांत किशोर यांची रणनीती होती. त्यानंतर त्यांनी या कामातून संन्यास घेण्याची घोषणा केली असली तरी येत्या काही महिन्यात उत्तर प्रदेश, पंजाब गोवा या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकात बंगाल किंवा महाराष्ट्र फॉर्म्युला वापरून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले तर लोकसभा जिंकणे सुकर होवू शकेल असा कयास लावला जात आहे.

  भाजप विरोधात विरोधी पक्षांची मोट

  त्यामुळे मोदी आणि शहा यांच्याविरोधात योग्य रणनीती आखली तर त्यांचा पराभव केला जाऊ शकतो हा आत्मविश्वास प्रशांत किशोर यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीने दिला. त्यामुळेच आता प्रशांत किशोर देशभर भाजप विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. आज शरद पवारांबरोबर त्यांची झालेली भेट याचाच भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशांत किशोर सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत तीन तास पवार यांच्या निवास स्थानी होते.  त्यामुळे राजकारणावर चर्चा झाली नाही असे म्हणता येत नाही. देशात काँग्रेस पक्ष कमजोर होत असताना भाजपला टक्कर देणा-या सर्व राज्यातील भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा महत्वाचा भाग आहे.

  पवारांचे स्थान महत्वाचे

  शरद पवार यांचे देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे या सर्व पक्षांना भाजपा विरोधात उभे करायचे असेल तर शरद पवार यांची भुमिका महत्वाची आहे. त्यादृष्टीनेच प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेऊन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची दृष्टीने भाजप विरोधात आघाडीची चर्चा केल्याचे मानले जात आहे. प्रशांत किशोर यांनी यापूर्वी भाजपा बरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे निवडणूक रणनितीकार म्हणूनही काम केले आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांबरोबर काम करण्याचा अनुभव आणि निवडणूक रणनीती या दोन्ही गोष्टी लक्षात घेता शरद पवार यांना पुढे करून देशात भाजप विरोधात आघाडी उभी करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

  देशात ४ राज्यांची विधानसभा निवडणूक

  याशिवाय पुढील वर्षी २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात देशात ४ राज्यांची विधानसभा निवडणूक होत आहे. त्यात उत्तर प्रदेश सारखे महत्त्वाचे राज्य असून पंजाब, उत्तराखंड, गोवा या राज्यांचा समावेश आहे.  या राज्यातही भाजप विरोधातील पक्षांना एकत्र आणून भाजपविरोधात लढा दिला जाऊ शकतो. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या भेटीत त्याबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या भेटीने राजकारणात नव्याने चर्चा झाली ही भेट देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारी आहे का हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.