समस्या राज्याच्या प्रमुखांच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल : अजित पवार

पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. पवारसाहेब ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत असताना त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरीता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावरही पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.

    मुंबई : राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. त्यांच्या काही समस्या मांडत असतात. ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

    पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. पवारसाहेब ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत असताना त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरीता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावरही पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.

    या बैठकीला मला, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात यांना बोलावण्यात आले नाही याचा अर्थ ही राजकीय चर्चा नसावी. पक्षीय चर्चा असती तर कदाचित आम्हाला बोलावलं असतं असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.