पवार, ठाकरेंच्या आदेशावरूनच वसुली; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा

अनिल देशमुख यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे माझी वसूली चालू होती असे स्पष्ट सांगावे. म्हणजे विषय तिथेच संपेल, असे किरीट सोमय्यां म्हणाले. परमबीरसिंग यांनी केलेल्या वसुलीच्या आरोपानंतर हायकोर्टाने सीबीआय चौकशीला हिरवा कंदील दिला आहे. त्यावरून सोमय्यांनी टीका केली.

    मुंबई :  जे सचिन वाझेंनी केले तेच परमबीर सिंह यांनी केले; अनिल देशमुख यांनी देखील तेच करावे. वाझेंनी सगळ्यांची नावे दिलेली दिसत आहेत, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख सांगत होते अशी माहिती दिली असून तसेच अनिल देशमुख यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे माझी वसूली चालू होती असे स्पष्ट सांगावे. म्हणजे विषय तिथेच संपेल, असे किरीट सोमय्यां म्हणाले. परमबीरसिंग यांनी केलेल्या वसुलीच्या आरोपानंतर हायकोर्टाने सीबीआय चौकशीला हिरवा कंदील दिला आहे. त्यावरून सोमय्यांनी टीका केली.

    माझ्याकडे अनेक कागदपत्रे आहेत ज्यामधून हे फंड कलेक्शन वरपर्यंत जात होते आणि त्याचे अनेक लाभार्थी असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून अनिल परब हे हॅण्डलर होते. शरद पवारांनी अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न का केला? कारण स्पष्ट आहे…की लाभार्थी. माझ्या माहितीप्रमाणे आणखी चार लाभार्थी आहेत. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले…याशिवाय आणखी चार लाभार्थींची नावं बाहेर येणार आहेत असा दावा किरीट सोमय्यांनी केलाय.

    दरम्यान, अजून तरी सीबीआयने तपास सुरु केलेला नाही. एनआयए, सीबीआय आणि यानंतर ईडीपासून इतर सगळ्या यंत्रणा जेव्हा कामाला लागणार तेव्हा ठाकरे सरकारचे अर्धे डझन आऊट होतील असा टोमणाही सोमय्यांनी हाणला.