पवार-शाहांची भेट राजकीय नाही, प्रवीण दरेकरांनी केला मोठा खुलासा…

शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शरद पवार थोड्याच वेळात संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. 

    मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी दिलेले अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शाह आणि पवार यांची भेट होणार असल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. मात्र, ही राजकीय भेट आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.

    सहकार संदर्भात काही महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं मत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शरद पवार थोड्याच वेळात संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत.

    दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यायलाच हवी. नाहीतर दोन डोस घेतल्याचा फायदा काय? असा सवाल दरेकर यांनी विचारला आहे. तर राज्य सरकारची मोगलाई सुरु आहे. मंदिरं बंद आणि मदीरालय सुरु आहेत. त्यामुळे सरकारला लोकांच्या भावनेचा आदर नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.