uddav thackery and sharad pawar

मराठा आरक्षणाबाबत देखील दोघांमध्ये महत्त्वाची बोलणी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आता शरद पवारांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यसभेत शेतकरी विधेयकासंदर्भात काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या दोघांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या यासह अन्य काही विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील महत्त्वाची बैठक आज पार पडली. केंद्र सरकारने आणलेल्या शेतकऱ्यांशी संबंधित विधेयकावर (Farmer bill) यावेळी चर्चा झाली. या विधेयकाला शिवसेनेने (Shivsena) लोकसभेत पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभुमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) cही बैठक पार पडली. साधारण पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली. राज्यातील कोरोनाग्रस्तांची (Corona) आकडेवारी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मागच्या काही दिवसात वाढला आहे. या मुद्यावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली.

तसेच मराठा आरक्षणाबाबत देखील दोघांमध्ये महत्त्वाची बोलणी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आता शरद पवारांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यसभेत शेतकरी विधेयकासंदर्भात काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या दोघांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या यासह अन्य काही विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ४५ मिनिट चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे देखील उपस्थित होते.