Covid-19 can cause loneliness and special challenges in visually impaired seniors

खेडोपाड्यात,झोपडपट्यांमध्ये उदरनिर्वाहाचे साधन नसलेले लाखो वयोवृद्ध लोक भणंग आयुष्य जगत आहेत.त्यांना इच्छा असली तरी त्यांच्या कुवतीला झेपेल असे काम कोणी देत नाही.तेव्हा देशाला युवा पिढी देणाऱ्या या वयोवृद्धांना  सन्मानपूर्वक जगता यावे म्हणून सरकारनेच जबाबदारी घ्यावी यासाठी ही मोहीम सुरू करत असल्याचे रवि भिलाणे यांनी म्हटले आहे.

    मुंबई: राज्यातील साठ वर्षावरील प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तींला सरकारतर्फे सन्मान वेतन म्हणून दरमहा दहा हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी जनता दल (सेक्युलर)च्या वतीने करण्यात आली असून त्यासाठी मुंबईतील पक्ष कार्यालयात, वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिमेला सुरवात करण्यात आली. जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी जी.जी.पारीख ( वय वर्ष ९७) यांनी वयोवृद्ध जनतेची नोंदणी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आलेल्या लिंक वर जाऊन सर्वप्रथम आपली सदस्यता नोंदवत जनतेनेही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख संयोजक आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवि भिलाणे यांनी दिली.

    वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिम
    जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यातील लाखो वयोवृद्धांना या मोहिमेत सामील करून घेण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला असून आज पक्षाचे प्रदेश महासचिव प्रताप होगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वयोवृद्ध जनता सन्मान वेतन मोहिम सदस्य नोंदणी लिंकचे उदघाटन करण्यात आले.सोशल मीडिया तसेच सभा,मेळावे आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो वयोवृद्धांना या मोहिमेचे सदस्य करून घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.  या उदघाटन समारंभाला मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर,महासचिव ज्योती बडेकर,ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे, विजय त्रिभुवन,कामगार नेते सीताराम लव्हांडे,मुंबई सचिव संदेश गायकवाड,मतीन खान,प्रशांत राणे,फारूक मापकर,सतीश सत्ते,प्रशांत राणे,आर.आर.चांदणे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    संपर्क साधण्याचे आवाहन
    आज खेडोपाड्यात,झोपडपट्यांमध्ये उदरनिर्वाहाचे साधन नसलेले लाखो वयोवृद्ध लोक भणंग आयुष्य जगत आहेत.त्यांना इच्छा असली तरी त्यांच्या कुवतीला झेपेल असे काम कोणी देत नाही.तेव्हा देशाला युवा पिढी देणाऱ्या या वयोवृद्धांना  सन्मानपूर्वक जगता यावे म्हणून सरकारनेच जबाबदारी घ्यावी यासाठी ही मोहीम सुरू करत असल्याचे रवि भिलाणे यांनी म्हटले आहे. या मोहिमेत सामील होऊ इच्छिणाऱ्यानी ९५९४४५२८०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच इच्छुक व्यक्ती पुढील लिंकद्वारे मोहिमेचे सदस्य होऊ शकतील. https://forms.gle/szkwNanhK611wPcq7