The bride was forced to drink a bottle of acid, and her father-in-law's congregation locked the house and fled.

अ‌ॅसिड हल्ल्यामध्ये(Acid attack) आपले सर्वस्व गमावलेली पीडित व्यक्ती ही दिव्यांग व्यक्तींप्रमाणे अधिकार व कायद्यातील तरतुदीनुसार (आरपीडब्ल्यूडी) नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाचा लाभ मिळण्यासाठी पात्र आहे, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) नोंदवले आणि याचिकाकर्त्या महिलेला १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकाला देत खंडपीठाने पीडित महिलेला दिलासा दिला.

    मुंबई : अ‌ॅसिड हल्ल्यामध्ये(Acid attack) आपले सर्वस्व गमावलेली पीडित व्यक्ती ही दिव्यांग व्यक्तींप्रमाणे अधिकार व कायद्यातील तरतुदीनुसार (आरपीडब्ल्यूडी) नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाचा लाभ मिळण्यासाठी पात्र आहे, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) नोंदवले आणि याचिकाकर्त्या महिलेला १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकाला देत खंडपीठाने पीडित महिलेला दिलासा दिला.

    २०१० साली दोन मुलांची आई असलेली महिला झोपेत असतानाच तिच्या पतीने चेहऱ्यावर अ‌ॅसिड सदृश्य पदार्थ ओतला. या घटनेत महिला भाजली असून तिला अपंगत्व आले आहे. उपचारासाठी महिलेने आतापर्यंत ५ लाख रुपये खर्च केले असून सरकारकडून काहीच आर्थिक सहार्य मिळत नसल्याने तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

    या याचिकेवर न्या. उज्जल भुयान आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, सदर प्रकऱण हे अत्यंत दुर्दैवी प्रकरण आहे. संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार सार्थक व सन्मानाने जीवन जगण्याचा याचिकाकर्त्या महिलेला अधिकार आहे. पण पीडित महिलेसाठी हे दूरचे स्वप्न आहे.

    अशा परिस्थितीत आम्ही जर याचिकाकर्त्याला नुकसान भरपाई मिळवून देऊ शकलो नाही, किंवा तिच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना केली नाही, तर न्यायालाय आपल्या कर्तव्यात अपयशी ठरेल. त्यामुळे तीन महिन्यात तिला १० लाख रुपये नुकसान भरपाई व तिच्या उपचाराचा खर्च उचलण्याचे आदेश सरकारला देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.