जनतेने भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली, पदवीधर मतदारसंघांच्य विजयानंतर रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, भाजपसाठी ही निवडणूक (graduate constituencies) प्रतिष्ठेची असली तरी महविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली.

मुंबई : भाजपला (BJP)  पदवीधर व शिक्षक मतदार (graduate constituencies) निवडणूकीत मोठा झटका बसला आहे. भाजपाच्या बालेकिल्यावरही महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तसेच नागपूर (Nagpur graduate constituencies) आण पुणे येथील प्रतिष्ठित जागेवरही भाजपला हार पत्कारावी लागली आहे. मागील २० वर्षांपासूनचे वर्चस्व असलेल्या पुणे मतदारसंघातही भाजपच्या वाट्याला पराभव पाहायला मिळाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार पुढे म्हणालेत की, भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं #महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी भाजपाने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.