prakash aambedkar

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौराकेल्याशिवाय लोकांना दिलासा मिळणार नाही. परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी हताश झाला आहे. ते सरकारच्या मदतीची आपेक्षा करत आहे. असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मुंबई : परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात (Huge loss Of Farmers) नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने शेतातील काढीला आलेल्या पिकांचे आतोनात नुकसान(Crops Affected in flood) झाले आहे. तसेच कापून रचलेल्या पिकांची गंजीच पुरात वाहुन गेल्याचे चित्र परतीच्या पावसात पाहायला मिळाले. त्यामुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांची नासाठी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी (CM) पूरग्रस्त भागांचा दौरा करावा असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौराकेल्याशिवाय लोकांना दिलासा मिळणार नाही. परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी हताश झाला आहे. ते सरकारच्या मदतीची आपेक्षा करत आहे. असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थीती असलेल्या भागाचा दौरा करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम बरोबर बैठक घेऊन जी मदत करता येईल ती तात्काळ घोषित करावी. अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.