Mumbai Municipal Corporation announces rules for Ganeshotsav

सर्वात महत्वाचा बदल म्हणजे विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती सुपूर्द करावी लागणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट मूर्ती विसर्जन करता येणार नाही. मोठ्या गणेश मंडळांची मागणी होती की, कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जन करणे कठीण जात असल्याने आम्हाला चौपाट्यांवर किंवा नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात यावी, ही मागणी बैठकीत मान्य करण्यात आली आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का? याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

  मुंबई : मुंबईतील गणेश विसर्जनासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिका आणि गणेश मंडळांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सार्वजनिक मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच चौपाट्यांवर गणेश मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.

  ४ फुटांची मूर्ती असणार

  यंदाही घरगुती गणेशाच्या २ फुटांच्या आणि सार्वजनिक मंडळाच्या ४ फुटांच्या मूर्ती असणार आहेत. मूर्ती ४ फुटांच्या असल्या तरी त्याचा पाट आणि डेकोरेशन यासह मूर्तीची उंची वाढणार आहे. यामुळे पालिकेने ही मर्यादा लागू करू नये, अशी मागणी समन्वय समितीने यावेळी केली आहे. यावर गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

  घरगुती गणेशाच्या मूर्त्या २ फुटांच्या तर सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती ४ फुटांच्या

  मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत विसर्जन मिवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, चौपाट्यांवर गणेश मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे. गणेश उत्सवाबाबत या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
  चौपाट्यांवर विसर्जनासाठी १० कार्यकर्त्यांनाच परवानगी असणार आहे.

  चौपाट्यांवर गणपती विसर्जनास मुभा

  गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सार्वजनिक गणेश उत्सवाचे नियम लागू राहणार आहेत. सार्वजनिक उत्सवासाठी गणेश मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती गणेशाच्या मूर्तीची उंची दोन फूट असेल. गर्दी होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यायची आहे. मुंबई महापालिका ८४ ठिकाणे विसर्जनाची सोय उपलब्ध करुन देणार आहे.

  गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी

  भाविकांना दर्शन; पोलिसांच्या बैठकीनंतर निर्णय

  मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत पालिका प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळ तसेच समन्वय समिती यांची बैठक पालिकेच्या परळ येथील कार्यालयात झाली. या बैठकीदरम्यान समन्वय समितीने विसर्जनस्थळी कार्यकर्त्यांना जाण्याची मागणी केली आहे.

  मंडळाचे १० कार्यकर्ते मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती घेऊन जातील

  सर्वात महत्वाचा बदल म्हणजे विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती सुपूर्द करावी लागणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट मूर्ती विसर्जन करता येणार नाही. मोठ्या गणेश मंडळांची मागणी होती की, कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जन करणे कठीण जात असल्याने आम्हाला चौपाट्यांवर किंवा नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात यावी, ही मागणी बैठकीत मान्य करण्यात आली आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का? याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

  लसीचे २ डोस घेतलेल्या मंडळातील कार्यकर्त्यांना मूर्ती विसर्जनाची परवानगी

  काय आहेत मागण्या?

  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळे, समन्वय समिती याची पालिका अधिकारी आणि प्रशासनासोबत बैठक झाली. या बैठकीत गेल्यावर्षी गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मंडळाच्या लसीचे २ डोस घेतलेल्या कार्यकर्त्यांना मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. भाविकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन दर्शन घेता यावे यासाठी परवानगी देण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली असल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली.

  गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का? याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन घेणार

  मंडळाचे १० कार्यकर्ते मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती घेऊन येतील. विसर्जनस्थळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती सुपूर्द करतील. त्यानंतर पालिका कर्मचारी मूर्तीचे विसर्जन करतील. गर्दी होण्याची शक्यता असल्याने, ऑफलाईन दर्शनाची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारच्या आदेशाने योग्य तो निर्णय घेतला जाईल.

  - हर्शद काळे, उपायुक्त, पालिका