अजित पवारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका; पोलिसांकडून १०० कोटींची खंडणी मागितल्याचा याचीकेतून आरोप

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले निलंबित सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेंनी एनआयए विशेष न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांचे निकटवर्तीय दर्शन घोडावत यांनी (वाझेंना) आपल्याला गुटखा व्यापाऱ्यांकडून अजित पवारांसाठी १०० कोटी वसूल करण्यास सांगितले होते असा आरोप केला आहे. त्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे वकील रत्नाकर डावरे यांनी दाखल केली आहे.

    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलिसांना १०० कोटींची खंडणी गोळा करण्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला असून सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.

    अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले निलंबित सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेंनी एनआयए विशेष न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांचे निकटवर्तीय दर्शन घोडावत यांनी (वाझेंना) आपल्याला गुटखा व्यापाऱ्यांकडून अजित पवारांसाठी १०० कोटी वसूल करण्यास सांगितले होते असा आरोप केला आहे. त्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे वकील रत्नाकर डावरे यांनी दाखल केली आहे.

    सदर पत्र न्यायालयानं मान्य केले नसले तरीही यात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले असून त्यानुसार परिवहन मंत्री अनिल परब यांनी सैफी बुऱ्हानीं अपलिफ्टमेंट ट्रस्ट ( एस बी यू टी) च्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या विरोधातील पोलीस कारवाई थांबवण्यासाठी ५० कोटींची मागणी केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच परब यांनी मुंबई महानगर पालिकेने काळया यादीत टाकलेल्या ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये आपल्याला वसूल करण्यास सांगितले असल्याचा आरोपही वाझेंने पत्रात केला होता. या पत्रातील आरोपांची शहनिशा करण्यासाठी अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेतून केली आहे. सदर याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.