पेट्रोल डिझेलच्या मागणीत घट, लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प, वाहतूक आणि पर्यटन व्यवसायाला फटका

गेल्या काही दिवसांत पर्यटन उद्योगाला मंदीचे दिवस आलेत. लॉकडाऊन आणि प्रवास करण्यावरील निर्बंधांमुळे पर्यटन उद्योगातील अनेकजण देशोधडीला लागले आहेत. त्याचप्रमाणे खासगी टॅक्सीचालक, कॅबचालक आणि इतर वाहनचालकांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झालाय. त्यामुळे या वर्षभरात पेट्रोलची मागणी ७ची  टक्क्यांनी तर डिझेलची मागणी १२ टक्क्यांनी घटलीय. 

    देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून दररजो ३ लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह होत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये भरच पडत आहे. याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे, तर उद्योगधंद्यांवरदेखील होत आहे. याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीवरही झालाय.

    गेल्या काही दिवसांत पर्यटन उद्योगाला मंदीचे दिवस आलेत. लॉकडाऊन आणि प्रवास करण्यावरील निर्बंधांमुळे पर्यटन उद्योगातील अनेकजण देशोधडीला लागले आहेत. त्याचप्रमाणे खासगी टॅक्सीचालक, कॅबचालक आणि इतर वाहनचालकांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झालाय. त्यामुळे या वर्षभरात पेट्रोलची मागणी ७ची  टक्क्यांनी तर डिझेलची मागणी १२ टक्क्यांनी घटलीय.

    गेल्या वर्षभरातील आकडेवारीनुसार पेट्रोलच्या मागणीत २० लाख २४ हजार टनांनी, तर डिझेलच्या मागणीत ९८ लाख ३३ हजार टनांनी घट नोंदवण्यात आलीय. दोन्ही मिळून झालेली घट ही १ कोटी १८ लाख  ५७ हजार टन इतकी आहे. पेट्रोलिअम मंत्रालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आलीय.

    गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत वाहतूक सुमारे दीड महिना पूर्णतः बंद होती. त्यानंतर राज्यबंदी आणि जिल्हाबंदीमुळे अनेक महिने वाहतुकीवर मर्यादा होत्या. त्याचा फटका वाहतूक आणि पर्यटन उद्योगांना बसला. यंदाच्या मार्चमध्ये गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत वाढ झालीय. मात्र पुन्हा एकदा देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे उद्योजकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.