सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर, सरकारला झाला ‘इतक्या’ कोटींचा नफा

मंगळवारी इंधनाच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. आज तिसरा दिवस आहे ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात आता पेट्रोलच्या दरात एकूण 9 वेळा वाढ झाली आहे. डिझेल पाच वेळा महागलं आणि एक वेळा स्वस्त झालं आहे. याच्या अगोदर जून आणि मे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास 16-16 वेळा दरवाढ झाली आहे.

    मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत स्थिरता पाहायला मिळत आहे. देशभरात इंधनाच्या किंमतीच्या रेकॉर्ड ब्रेक झाला असून अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरीपार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांची किंमती वाढल्या आहेत.त्यामुळे याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर झाला आहे.

    या आठवड्यात लोकसभेत सरकारने सांगितलं की, पेट्रोल डिझेलमार्फत टॅक्स कलेक्शन 88 टक्क्यांहून अधिक झालं आहे. सरकारला 3.35 लाख करोड रुपयांचा फायदा झाला आहे. हा आकडा 31 मार्च 2021 पर्यंतचा आहे. गेल्या एका वर्षात पेट्रोलच्या एक्साइज ड्यूटी 19.98 रुपये प्रतिलीटरने वाढून 32.9 रुपये प्रती लीटरपर्यंत पोहोचले. या अगोदर एप्रिल 2019 ते मार्च 2020 दरम्यान पेट्रोल-डिझेलवरील टॅक्सकडून सरकारला 1.78 लाख करोड रुपये जमा झाले आहेत.

    इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी इंधनाच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. आज तिसरा दिवस आहे ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात आता पेट्रोलच्या दरात एकूण 9 वेळा वाढ झाली आहे. डिझेल पाच वेळा महागलं आणि एक वेळा स्वस्त झालं आहे. याच्या अगोदर जून आणि मे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास 16-16 वेळा दरवाढ झाली आहे.

    देशात सर्वात महागडं पेट्रोल-डिझेलचे दर या शहरात

    देशात सर्वाधिक महागडं पेट्रोल आणि डिझेल हे राजस्थानच्या गंगानगर आणि मध्य प्रदेशच्या अनुपपूरमध्ये मिळतं. गंगानगरमध्ये पेट्रोलचा दर 113.21 रुपये आणि डिझेलचे दर 103.15 रुपयांवर मिळत आहे. अनुपपूरमध्ये आजचा पेट्रोलचा दर 112.78 रुपये आणि डिझेलचा दर 101.15 रुपये आहे.