पेट्रोल डिझेलच्या भाववाढीचा सिलसिला पुन्हा सुरू, सलग दुसऱ्या दिवशी भाववाढ

आज (बुधवार) पेट्रोलच्या भावात १९ पैशांची तर डिझेलच्या भावात २१ पैशांची वाढ नोंदवण्यात आलीय. मंगळवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलचे भाव वधारले होते. मंगळवारी पेट्रोलमध्ये १५ पैशांची तर डिझेलमध्ये १८ पैशांची भाववाढ झाली होती. २७ फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. मात्र आता ते वाढायला सुरुवात झालीय. 

    गेल्या काही दिवसांपासून दिलासा देत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी खायला सुरुवात केल्याचं चित्र निर्माण झालंय. पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे आता पुन्हा एकदा पेट्रोल शंभरीकडे वाटचाल करणार की काय, असा प्रश्न निर्माण झालाय.

    आज (बुधवार) पेट्रोलच्या भावात १९ पैशांची तर डिझेलच्या भावात २१ पैशांची वाढ नोंदवण्यात आलीय. मंगळवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलचे भाव वधारले होते. मंगळवारी पेट्रोलमध्ये १५ पैशांची तर डिझेलमध्ये १८ पैशांची भाववाढ झाली होती. २७ फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. मात्र आता ते वाढायला सुरुवात झालीय.

    पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत होते. निवडणुकांचे  निकाल लागल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झालीय. सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेलीय. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडायला सुरुवात झालीय.

    कोरोनाची दुसरी लाट आणि घटत चाललेली पेट्रोलियम उत्पादनांची मागणी या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर उतरते राहतील, असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विविध राज्यात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे वाहतूक आणि पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. त्याचा परिणामही पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीवर होताना दिसत आहे. मात्र सध्या तरी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.