पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, संजय राऊत यांची खोचक टीका

देशातील जनतेचे महागाईपासून रक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं काम आहे. व्यापारात फायदा होतो की तोटा? हे बघायला सरकार बसलेलं नाही. आपण रामराज्यात राहतो. पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात म्हणजे नेपाळ आणि श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

    मुंबई: इंधन दरवाढीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केल्ल्या वक्तव्याचा समाचार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका, असं सांगतानाच पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

    रावणाच्या श्रीलंकेतही इंधन स्वस्त

    देशातील जनतेचे महागाईपासून रक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं काम आहे. व्यापारात फायदा होतो की तोटा? हे बघायला सरकार बसलेलं नाही. आपण रामराज्यात राहतो. पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात म्हणजे नेपाळ आणि श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

    पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. सत्ताही भाजपला श्रीरामाच्या नावावर म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे. राजकारणात धर्माला जास्त महत्त्व दिलं जात आहे, असं सांगतानाच लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल- डिझेल दरवाढ करणं. या दरवाढीसंदर्भातील धर्मसंकट यूपीए सरकारवरही होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे. तुम्ही तर पळ काढत आहात, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.