पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; वाहनधारकांच्या खिशात बाकी काहीच उरणार नाही

काल सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात १८ ते २० पैशांची वाढ झाली तर पेट्रोलचे दर १५ ते १७ पैशांनी वाढले होते. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना किमान मर्यादा किती असावी याचं काही सोयर सुतकच राहिलेलं नाहीये. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक गोष्टीत बदल झाले त्यापैकीच ही एक. दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी सर्वसामान्यांना पार वात आणलाय. आता तर कोरोना काळातही यात सातत्याने वाढच होते आहे. याताच दोन्हीं इंधनांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यात आता राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर ८० रुपयांच्या वर गेले आहेत.

काल सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात १८ ते २० पैशांची वाढ झाली तर पेट्रोलचे दर १५ ते १७ पैशांनी वाढले होते. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रभरातील तब्बल १९ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी ९० रुपयांचा टप्पा ओलांडला असून मुंबई त्या उंबरठ्यावर आहे. मुंबई शहरामध्ये डिझेलची किंमत २४ पैशांनी वाढून ७९.६६ रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलच्या किंमतीही १९ पैशांनी वाढल्या आहेत.

नागपूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलच्या किंमत एका लिटरला ८० रुपयांच्या वर गेली आहे. परभणीत पेट्रोल दर सर्वाधिक ९१.९५ रुपये आहे.