पेट्रोल दरात १८ दिवसात पाचव्यांदा वाढ

पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी केलेल्या इंधन दरवाढीने दिल्लीत पेट्रोल दर रेकॉर्ड स्तरावर गेला आहे. सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी 25 पैसे वाढ केली यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 84.95 रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोल 91.56 रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकावर आहे. नव्या वर्षात कंपन्यांनी आस्ते कदम दरवाढीची भूमिका घेतली आहे.

मुंबई (Mumbai).  पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी केलेल्या इंधन दरवाढीने दिल्लीत पेट्रोल दर रेकॉर्ड स्तरावर गेला आहे. सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी 25 पैसे वाढ केली यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 84.95 रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोल 91.56 रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकावर आहे. नव्या वर्षात कंपन्यांनी आस्ते कदम दरवाढीची भूमिका घेतली आहे.

चालू महिन्यात 18 दिवसात पाचवेळा पेट्रोल दरात वाढ झाली आहे. ज्यात पेट्रोल 1.24 रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या सहामाहीत पेट्रोल दरात मोठी वाढ झाली होती. ज्यात पेट्रोल 15 रुपयांनी महागले आहे. याच कालावधीत डिझेल दरवाढ देखील सुरूच आहे. पाच वेळा झालेल्या दरवाढीने डिझेलमध्ये 1.26 रुपयांची वाढ झाली आहे. मागील 10 महिन्यात डिझेल 13 रुपयांनी महागले आहे.

सोमवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी 25 पैसे वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 91.56 रुपये झाला आहे. एक लीटर डिझेलचा भाव 81.87 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव 84.95 रुपये झाला आहे. डिझेलचा भाव 73.13 रुपये आहे. चेन्नईत देखील पेट्रोलचा भाव 87.63 रुपये असून डिझेल 80.40 रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 86.39 रुपये असून डिझेल 78.72 रुपये आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव 11 सेंट्सने घसरला असून तो 52.25 डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव 12 सेंटसने कमी होऊन 56.69 डॉलर झाला.