सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक, दर ‘ऑल टाईम हाय’वर स्थिर

पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या नवनवे उच्चांक नोंदवत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. प्रिमिअम पेट्रोलने तर आठ दिवसांपूर्वीच शंभरी पार केली आहे. सलग १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. या भाववाढीला आज ब्रेक लागला असून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले नाहीत. पेट्रोल डिझेलच्या भावात घट झाली नसली, तरी सध्याचं महागाईचं चित्र पाहता, भाव स्थिर राहणे हा देखील सर्वसामान्यांसाठी दिलासा मानला जातोय.

  गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांना रविवारपासून ब्रेक लागल्याचं चित्र आहे. गेले १२ दिवस सततच्या भाववाढीनंतर रविवारी कायम होते. आजदेखील (सोमवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. शनिवारच्याच भावावर ते स्थिर आहेत.

  पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या नवनवे उच्चांक नोंदवत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. प्रिमिअम पेट्रोलने तर आठ दिवसांपूर्वीच शंभरी पार केली आहे. सलग १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. या भाववाढीला आज ब्रेक लागला असून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले नाहीत. पेट्रोल डिझेलच्या भावात घट झाली नसली, तरी सध्याचं महागाईचं चित्र पाहता, भाव स्थिर राहणे हा देखील सर्वसामान्यांसाठी दिलासा मानला जातोय.

  गेल्या १२ दिवसांतील दरवाढीचा आढावा घेतला तर पेट्रोल एकूण ३ रुपये २८ पैशांनी महागलंय. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील धनबादमध्ये पेट्रोलनं शंभरी ओलांडलीय. तर राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील अनेक शहरांत पेट्रोल शंभरच्या पुढं पोहोचलंय. तर गेल्या १२ दिवसांत डिझेल ३ रुपये ४९ पैशंनी महागलंय.

  नव्या आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू होणार असल्याने हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र उत्पादन शुल्क कमी होणार असल्याने दरांत फारसा फरक पडणार नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र दरवाढ झाली नाही, तरी सध्याचे दर हेच सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणत असल्याचं चित्र आहे.

  विविध शहरांत असे आहेत पेट्रोलचे दर

  • दिल्ली – ९०.५८ / ८०.९७
  • मुंबई – ९७ / ८८.०६
  • कोलकाता – ९१.७८ /  ८४.५६
  • चेन्नई – ९२.५९ / ८५.९८
  • नोएडा – ८८.९२ / ८१.४१