जबाबासाठी येणे रश्मी शुक्लानी टाळले; सायबर सेलला ई-मेल पाठवला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिन्याभरापूर्वी पोलीसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांमध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचा उल्लेख केला होता. याचसंदर्भातफोन टॅपिंग प्रकरणी तपासाला वेग आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीकेसी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांनी समन्स बजावले आहे. जबाबासाठी येणे रश्मी शुक्लानी टाळले असून सायबर सेलला ई-मेल पाठवला असल्याचे समजते.

    मुंबई  : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिन्याभरापूर्वी पोलीसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांमध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचा उल्लेख केला होता. याचसंदर्भातफोन टॅपिंग प्रकरणी तपासाला वेग आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीकेसी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांनी समन्स बजावले आहे. जबाबासाठी येणे रश्मी शुक्लानी टाळले असून सायबर सेलला ई-मेल पाठवला असल्याचे समजते.

    फोन टॅपिंग प्रकरण घडले तेव्हा शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. शुक्ला यांना बुधवार २८ रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता सहाय्यक पोलिस आयुक्त एन. के. जाधव यांच्यासमक्ष जबाब नोंदवायचा आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने अन्य काही वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनाही चौकशी अधिकाऱ्यांकडून बोलावले जावू शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

    फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. या अहवालानंतर राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल उघड केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलfस दलात अतिरिक्त महासंचालक आहेत. फेब्रुवारीपासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असून हैदराबाद येथे त्या कार्यरत आहे.

    सध्या मी सीआरपीएफच्या विशेष महासंचालक, दक्षिण विभाग म्हणून सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहे. सध्याची कोविडची स्थिती व माझ्यावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी यामुळे मला सध्या माझे कार्यालय सोडून मुंबईला प्रवास करणे शक्य नाही असा ई-मेल शुक्ला यांनी सायबर सेलल केला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.