लेटर बॉम्बनंतर आता डेटा बॉम्ब, देवेंद्र फडणवीसांकडून फोन टॅपिंगचा गौप्यस्फोट

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवलेल्या पत्रानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक धमाका केलाय. आपल्याकडे पोलिसांच्या बदली प्रकरणातील फोन टॅपिंगचे सर्व रेकॉर्डिंग असल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चुकीचं ब्रिफींग दिल्याचं आश्चर्य वाटत असल्याचं ते म्हणाले.  गृहमंत्री अनिल देशमुख ५ ते १५ फेब्रुवारी या काळात हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळे ते कुणालाही भेटण्याचा आणि वसुलीचे आदेश देण्याचा संबंधच येत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मात्र त्यांचा हा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलाय. १७ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री क्वारंटाईन होते, मात्र आयसोलेटेड नव्हते, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

    क्वारंटाईन असताना गृहमंत्री अनेकांना भेटलेले आहेत. त्याचे पुरावेदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या काळात देशमुख कुणालाच भेटले नाहीत, हा पवारांचा दावा चुकीचा असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांच्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचं फडणवीस म्हणाले.

    पोलिसांच्या बदल्यांसंदर्भातील तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गेल्या वर्षीच देण्यात आले होते. मात्र त्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.