पोनि मनिष श्रीधनकरांमुळे गुन्ह्याची उकल; गावठी कट्टे बनवणाऱ्याला अटक,१० गावठी कट्टे, ६ काडतुसे जप्त

सन २०२० सालात पिस्तुल विकणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या युनिट ७ च्या पथकाने मुसक्या आवळल्या होत्या. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी लाखन सिंग हा फरार होता. त्याचा शोध सुरू असताना मुंबईत गावठी पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार युनिट ७ च्या पथकाने मिठाघर येथे सापळा लावून लाखन सिंगला अटक केली.

  मुंबई : गावठी कट्टे बनवणाऱ्या एमपीचा (मध्य प्रदेश) सराईत आरोपी लाखन सिंग (२१) याला शुक्रवारी पूर्व द्रुतगती मार्गावरील मिठाघर गेट येथे अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे क्राईम ब्रँच युनिट ७ च्या पथकाने केली. या कारवाईत १० गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे असा एकूण तीन लाख पाच हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे तपास पथकाने सांगितले.

  सन २०२० सालात पिस्तुल विकणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या युनिट ७ च्या पथकाने मुसक्या आवळल्या होत्या. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी लाखन सिंग हा फरार होता. त्याचा शोध सुरू असताना मुंबईत गावठी पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार युनिट ७ च्या पथकाने मिठाघर येथे सापळा लावून लाखन सिंगला अटक केली.

  मात्र या कारवाई दरम्यान रस्त्याच्या पलीकडे असलेले त्याच्या दोन साथीदारांनी तेथून पळ काढला. चौकशी दरम्यान पोलिसांनी लाखनच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात गावठी कट्टे व काडतुसे आढळले. या प्ररकणाची नवघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  सदर कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) विरेश प्रभू, गुन्हे प्रकटीकरण १ चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे, युनिट ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंद बागडे, सुनयना सोनावणे, पोउनि निलेश चव्हाण, स्वप्नील काळे, सपोउनि नामदेव परबळकर, हवालदार संतोष गुरव, सुभाष मोरे, पोलीस नाईक गिरीश जोशी, नामदेव चिले, राजाराम कदम, अंमलदार लुकमान सय्यद, गणेश पाटील, महेश सावंत आदी पथकाने केली.

  मुंबई, गुजरातमध्ये पिस्तुलांची बेकायदेशीर विक्री

  एमपीत पिस्तुल बनवणाऱ्या लाखनचा गेल्या आठ महिन्यांपासून युनिट ७ चे पथक शोध घेत होते. लाखन हा गावठी कट्टे बनवून मुंबई व गुजरातमध्ये विकत असल्याचे चौकशी दरम्यान उघडकीस आले आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले गावठी कट्टे कोणाला विकणार होता याचा तपास सुरू असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.