माहिम जंक्शनवर चितारण्यात आली कोरोना योद्ध्यांची चित्रे

मुंबई: - St+art आणि एशियन पेण्‍ट्सला मुंबईतील त्‍यांच्‍या नवीन प्रकल्‍पाची घोषणा केली आहे. हा प्रकल्‍प आयकॉनिक माहिम जंक्‍शन येथील भित्तिचित्रांच्‍या माध्‍यमातून

मुंबई: – St+art आणि एशियन पेण्‍ट्सला मुंबईतील त्‍यांच्‍या नवीन प्रकल्‍पाची घोषणा केली आहे. हा प्रकल्‍प आयकॉनिक माहिम जंक्‍शन येथील भित्तिचित्रांच्‍या माध्‍यमातून शहरातील प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत असलेल्‍या कर्मचाऱ्यांना मानवंदना देणारा आहे. गेल्‍या काही महिन्यांपासून कोविड-१९ आजाराने जगभरात थैमान घातले आहे. या संकटाच्‍या काळामध्‍ये आवश्‍यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका देखील दिसून आली आहे. माहिम रेल्‍वे स्‍थानकाच्‍या विस्‍तृत दर्शनी भागामध्‍ये असलेली ही भित्तिचित्रे प्रतिकूल स्थितीचा धैर्याने सामना करणारे आणि आपण सुरक्षित राहू यासाठी स्‍वत:चे जीवन धोक्‍यात टाकणारे ‘हिरोज ऑफ मुंबई’ला प्रशंसित करतात. या भित्तिचित्रांमध्‍ये देशाला सुरक्षित ठेवण्‍याप्रती निरंतरपणे झटत असलेले डॉक्‍टर्स, परिचारिका, भाजीपाला विक्रेते, डिलिव्‍हरी कर्मचारी व स्‍वच्‍छता कर्मचारी यांचा समावेश आहे.  

St+art इंडिया फाऊंडेशन म्‍हणते, ‘हिरोज ऑफ मुंबई’ प्रकल्‍प ‘आर्ट स्‍टेशन्‍स’ प्रकल्‍पाचे विस्‍तारीकरण आहे, जो रेलचेल असलेल्‍या ट्रान्झिट जागांना वॉक-थ्रू आर्ट गॅलरीजमध्‍ये रूपांतरित करतो आणि सार्वजनिक जागांना कलेच्‍या माध्‍यमातून प्रज्‍वलित करण्‍यासोबत त्‍यामधून महत्त्वाचा संदेश देतो. मुंबई उपनगरीय रेल्‍वे नेटवर्कच्‍या पश्चिम लाइनवर असलेल्या माहिम जंक्‍शनवर दररोज जवळपास २ लाख माणसांची रेलचेल असते.  गुजरातमधील स्ट्रिट आर्टिस्‍ट डूने ही भित्तिचित्रे डिझाईन केली असून उस्‍ताद मुनीर बुखारी पुढील १५ दिवसांमध्‍ये सादर करणार आहेत. रंगसंगतीशी निगडित पार्श्‍वभूमी असलेल्‍या डूचे एकरंगी व्‍यक्‍ती उठावदार दिसतात आणि प्रत्‍येक कलाकृतीमधून संबंधित कामगिरीचे महत्त्व दाखवण्‍यात आले आहे.  

एशियन पेण्‍ट्स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित सिंगले म्‍हणाले, आम्‍हाला कोविड-१९ विरोधातील या लढ्यामध्‍ये प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत असलेल्‍या कर्मचाऱ्यांचा सन्‍मान करणाऱ्या या खास प्रकल्‍पासाठी पुन्‍हा एकदा St+art सोबत सहयोग जोडण्‍याचा आनंद होत आहे. माहिम जंक्‍शन येथील ‘हिरोज ऑफ मुंबई’ प्रकल्‍प हा सध्‍याच्‍या अनपेक्षित काळामध्‍ये इतरांचे संरक्षण करण्‍यासोबत त्‍यांना सेवा देण्‍यासाठी स्‍वत:चे जीवन धोक्‍यात टाकणाऱ्या अनोख्या व्‍यक्‍तींचे आभार मानण्‍याचा एक प्रयत्‍न आहे. सेवेसोबतच या महामारीविरोधातील लढ्यामध्‍ये त्‍यांच्‍या योगदानाची आठवण करून देणाऱ्या या भित्तिचित्रांचा माहिम जंक्‍शन सारख्‍या सार्वजनिक ठिकाणी कलेच्‍या माध्‍यमातून त्‍यांचा सन्‍मान करण्‍याचा आणि सामाजिक संदेश देण्‍याचा मनसुबा आहे. हा प्रकल्‍प देशभरात सामाजिकदृष्‍ट्या सार्वजनिक कला प्रकल्‍प निर्माण करण्‍याच्‍या आमच्‍या मिशनचे विस्‍तारीकरण आहे.

पश्चिम रेल्‍वेचे मुख्‍य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर म्‍हणाले, माहिम स्‍टेशन येथील ‘हिरोज ऑफ मुंबई’ प्रकल्‍प स्‍टेशनचे सौंदर्य वाढवण्‍यासोबत कोविड-१९ योद्धांप्रती एकता व कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा एक अद्वितीय प्रयत्‍न आहे. आम्‍हाला सीएसआर उपक्रमांतर्गत पुन्‍हा एकदा या भव्‍य कलाकृतीसाठी एशियन पेण्‍ट्स आणि St+art इंडियासोबत सहयोग जोडण्‍याचा अभिमान वाटत आहे. आम्‍ही पश्चिम रेल्‍वेच्‍या विविध उपनगरीय स्‍थानकांवर अशाप्रकारचे अधिक सौंदर्यपूर्ण उपक्रम राबवण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.