true caller

'ट्रूकॉलर ॲप' भारतातील मोबाईल वापरणाऱ्यांचा डेटा चोरी(Truecaller App Involved In Data Theft) करून ती माहिती काही खासगी मोबाईल कंपन्यांना पुरवते, असा आरोप करत एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात(Mumbai High Court) धाव घेतली आहे.

    मुंबई : मोबाईलवर एखादा अनोळखी फोन नंबर आल्यास त्याची माहिती देणाऱ्या ‘ट्रूकॉलर ॲप’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल(PIL Against Truecaller App) करण्यात आली आहे.

    हे ‘ट्रूकॉलर ॲप’ भारतातील मोबाईल वापरणाऱ्यांचा डेटा चोरी(Truecaller App Involved In Data Theft) करून ती माहिती काही खासगी मोबाईल कंपन्यांना पुरवते, असा आरोप करत एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात(Mumbai High Court) धाव घेतली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने केंद्र सरकारच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासह इतर काही खाजगी कंपन्यांना नोटीस बजावली असून उत्तर देण्याचे निर्देशही दिले आहेत.

    आपल्या मोबाईलवर येणारे अनोळखी फोन नंबर ओळखता यावेत म्हणून स्विडन येथील ‘ट्रूकॉलर’ ही कंपनी मोबाईल वापरणाऱ्यांची माहिती कोणत्याही अधिकृत परवानगी शिवाय चोरते आणि माहितीचा डेटा भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, गुगल इंडिया तसेच कर्ज देणाऱ्या काही कंपन्यांना पुरवत असल्याचा दावा ॲडव्होकेट शशांक पोतसुरे यांनी केला आहे.

    भारतातील जवळपास ७५ टक्के लोकांची माहिती या कंपनीने गोळा केली आहे. एवढेच काय तर वापरकर्त्यांची परवानगी न घेताच युपीआय पेमेंटसाठी कंपनीमार्फत रजिस्ट्रेशन केले जात आहे. याप्रकरणी तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. म्हणूनच उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे याचिकाकर्त्यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारती एअरटेल, गुगल इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी प्रतिवाद्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आणि सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.