आरे कारशेडच्या जागी वन संग्रहालय करण्याची योजना

नव्या कारशेडवर (Aarey car shed)  शिक्कामोर्तब करण्यात आला नव्हता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, नव्या कारशेडवर शासनाकडून वन संग्रहायल (forest museum) करण्याची योजना आखण्यात येणार असल्याचं सांगतिलं जात आहे.

 मुंबई: आरे कॉलनी येथील मेट्रो तीन प्रकल्पासाठी कुलाबा-बांद्रा-सिप्झ या मार्गावरील सरकारने फुल्ली मारली होती. तसेच नव्या कारशेडवर (Aarey car shed)  शिक्कामोर्तब करण्यात आलं नव्हतं. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, नव्या कारशेडवर शासनाकडून वन संग्रहालय (forest museum) करण्याची योजना आखण्यात येणार असल्याचं सांगतिलं जात आहे. तसेच कांजूरमार्ग (Kanjurmarg) ,जोगेश्वरी आणि गोरेगाव (Goregaon) येथील तीन जागांसह अन्य पर्यायी जागांची चाचपणी सुरू केली आहे. कारशेडचे स्थानांतरण करण्याचा औपचारिक निर्णय घेतल्यानंतर वन संग्रहालय योजना आरे प्लॉटवर पुढे नेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. बहुचर्चित मेट्रो-३च्या आरे काऱशेडचे निम्मे काम झाल्यानंतर आता त्याचे गोरेगाव पहाडी येथील खाजगी जागेवर स्थलांतर करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. तसेच नव्या जागेचा पर्याय आजमावून पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे मधील ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरेच्या जमिनीबाबत निर्णय घेताना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. आरे भागात आदिवासी वस्ती आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना त्याचा प्रथम विचार करण्यात आला आहे. त्यामुळेच आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवले जावेत, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपड्या आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील. त्याचबरोबर येथील झोपड्यांचे पुनर्वसनही तातडीने सुरु केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे.