कृपया खोटे बोलणे थांबवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांचे ट्विटर वरून फडणवीस यांना आवाहन

कृपया खोटे बोलणे थांबवा त्यात त्यांनी कृपया खोटे बोलणे थांबवा असे आवाहनही फडणवीस यांना केले आहे. राज्यात केंद्राचा कोणताही प्रकल्पच नसल्याचे सांगत जी क्षमता आहे ती राज्याच्या स्वत:च्या प्रकल्पांची असल्याचे लक्षात आणून दिले आहे.

    मुंबई : प्रदेश काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी राज्यात ऑक्सिजन देण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मदतीबाबत विरोधीपक्ष नेत्यांनी केलेल्या दाव्याला ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. खोटे बोलणे थांबवा.

    कृपया खोटे बोलणे थांबवा त्यात त्यांनी कृपया खोटे बोलणे थांबवा असे आवाहनही फडणवीस यांना केले आहे. राज्यात केंद्राचा कोणताही प्रकल्पच नसल्याचे सांगत जी क्षमता आहे ती राज्याच्या स्वत:च्या प्रकल्पांची असल्याचे लक्षात आणून दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ” प्रिय @dev_fadnavis जी, आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे.

    वाहतुकीच्या अडचणी

    त्यांनी पुढे म्हटले आहे की या मध्ये तथ्य हे आहे की, महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन क्षमता महाराष्ट्रातील प्रकल्पाद्वारे १२५० मे.टन आहे. केंद्राच्या मान्यतेने प्राप्त होत असलेले ऑक्सिजन भिलाई ११० मे.टन / प्रति दिवस, बेलारी ५० मे.टन /प्रतिदिवस, जामनगर १२५ मे.टन/प्रति दिवस, व्हायजॅग ६० मे.टन सरासरी, ऑक्सिजन एक्सप्रेसने ७ टँकरने एकदा ११० मे.टन आणले आहे . त्यांनी पुढे म्हटले आहे की, सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांत २५००० मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता  व्यक्त केली होती. १७५०० मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला ७५०० मे.टन म्हणजे ५०० मे.टन/प्रति दिवस द्यायचे होते. परंतु ३४५ मे.टन/ प्रति दिवस मिळत आहे. उरलेल्यासाठी  वाहतूकीच्या अडचणी येत आहेत त्यामुळे कृपया खोटे बोलणे थांबवा असे आवाहनही त्यानी फडणवीस यांना केले आहे.