sharad pawar

सध्या युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवारांकडे जाणार का आणि पवार ती स्विकारून नवा प्रयोग करणार का, याबाबत उत्सुकता आहे. युपीएच्या सध्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची जागा शरद पवार घेतील, अशी शक्यता सध्या वर्तवली जातेय. शिवसेनेनंही या कल्पनेला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे शरद पवार महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर करून मोदीविरोधी ताकद उभी करू शकतील, असा सर्वपक्षीयांना विश्वास वाटतो.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सक्रीय असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. शरद पवार हे आजही देशाच्या राजकारणातील सर्वाधिक लक्षवेधी व्यक्तीमत्व ठरत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही लक्ष पवार काय करतायत, याकडे आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती एकतर्फी जिंकून नेईल, असं वाटत असतानाच शरद पवार मैदानात उतरले आणि बघता बघता त्यांनी राजकारणाचं चित्रच बदलून टाकलं. साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेनं या सगळ्या वातावरणावर कळस चढवला आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात त्याचे पडसाद उमटले. अनपेक्षितरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे १०० जागांपर्यंत पोहोचले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाची नांदी झाली.

महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेऊन तीन पक्षांची मोट बांधण्याचं कामही शरद पवार होते, म्हणूनच जमलं, असंच सर्व राजकीय विश्लेषक एका सुरात सांगतात. पवारांविना हे शक्य नव्हतं. उद्धव ठाकरेंशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि काँग्रेसमधील वरीष्ठ सूत्रांचा असलेला अंदाज या सर्वांची सांगड घालत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग शरद पवारांनी केला.

सध्या युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवारांकडे जाणार का आणि पवार ती स्विकारून नवा प्रयोग करणार का, याबाबत उत्सुकता आहे. युपीएच्या सध्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची जागा शरद पवार घेतील, अशी शक्यता सध्या वर्तवली जातेय.

शिवसेनेनंही या कल्पनेला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे शरद पवार महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर करून मोदीविरोधी ताकद उभी करू शकतील, असा सर्वपक्षीयांना विश्वास वाटतो. देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी पवारांचे सलोख्याचे संबंध आहेत. याचा फायदा युपीएला होऊ शकतो. पवारांच्या नेतृत्वामुळे युपीएला पुन्हा जीवंतपणा येईल, असंही अनेकांना वाटतं.

स्वतः शरद पवार यांनी असं होण्याची शक्यता सध्या तरी फेटाळून लावलीय. मात्र पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत, असं निरीक्षण नोंदवलं जातं. सध्या तरी पवार युपीएचे अध्यक्षपद घेणार नाही म्हणतायत. पुढं काय होतं, ते लवकरच कळेल.