पीएनबीला सलग चौथ्या वर्षी “राजभाषा कीर्ती” प्रथम पुरस्कार प्राप्त

14.09.2021 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित राजभाषा कार्यक्रमात "राजभाषा कीर्ती" प्रथम पुरस्कार माननीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि अजय कुमार मिश्रा आणि निशिथ प्रामाणिक यांच्या उपस्थितीत पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीएच. एस. एस. मल्लिकार्जुन राव यांनी स्वीकारला.

    मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला 2020-21 आर्थिक वर्षासाठी “राजभाषा कीर्ती” चा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. बँकांनी हिंदीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी हा पुरस्कार भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे दिला जातो. पंजाब नॅशनल बँकेला गेल्या चार वर्षांपासून राजभाषेचे सर्वोच्च “राजभाषा कीर्ती” प्रथम पारितोषिक मिळत आहे.

    14.09.2021 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित राजभाषा कार्यक्रमात “राजभाषा कीर्ती” प्रथम पुरस्कार माननीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि अजय कुमार मिश्रा आणि निशिथ प्रामाणिक यांच्या उपस्थितीत पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीएच. एस. एस. मल्लिकार्जुन राव यांनी स्वीकारला.

    पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने यावेळी मुख्य महाव्यवस्थापक-राजभाषा बी. एस. मान आणि सहाय्यक महाव्यवस्थापक-राजभाषा श्रीमती मनीषा शर्मा उपस्थित होत्या.