Police alert on the backdrop of a rainy convention 'Operation Allout' in Mumbai

संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ५ जूलैपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अभियान राबवले. शहरातील सर्व परिमंडळांंतर्गत २५२ ठिकाणांवर कोंबिंग ऑपरेशन आणि २०१ ठिकाणांवर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी नाकाबंदीदरम्रूान ७३४७ दुचाकींची तपासणी आणि १७५९ वाहनांवर कारवाई केली. पोलिसांनी ७५ वाहन चालकांवर ड्रंक अॅण्ड ड्रईव्ह अंतर्गत कारवाई केली.

    मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवशेन सोमवारपासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असल्यामुळे आधीपासूनच सर्व तयारी करण्यात आली आहे. अधिवेशनकाळात येथे सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसही सतर्क झाले असून अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुंबईत पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑलआऊट’ राबवले.

    मुंबई पोलिसांनी शहरात ‘कोंबिंग ऑपरेशन’ करून संशयित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची धरपकड केली. शहरात सुमारे २५२ ठिकाणांवर कोंबिंग ऑपरेशन करून १०३६ प्रकरणांची चौकशी केली. यादरम्यान पोलिसांनी ३८३ आरोपींना अटक केली असून यापैकी १०२ आरोपी विविध प्रकरणांमध्ये वॉन्टेड होते.

    संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ५ जूलैपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अभियान राबवले. शहरातील सर्व परिमंडळांंतर्गत २५२ ठिकाणांवर कोंबिंग ऑपरेशन आणि २०१ ठिकाणांवर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी नाकाबंदीदरम्रूान ७३४७ दुचाकींची तपासणी आणि १७५९ वाहनांवर कारवाई केली. पोलिसांनी ७५ वाहन चालकांवर ड्रंक अॅण्ड ड्रईव्ह अंतर्गत कारवाई केली.

    ८१५ हॉटेल, लॉजची झडती

    पोलिसांनी ८१५ हॉटेल, लॉज आणि खानावळींची झडती घेतली. पोलिसांच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’मध्ये शहरातील विविध परिसराच्या तपासणीदरम्यान ४९९ संवेदनशील ठिकाणांची चौकशी करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी ९९ जणांना ड्रग्जप्रकरणी अटक केली.

    ३७ जणांवर अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणी कारवाई

    पोलिसांनी ‘कोंबिंग ऑपरेशन’ अंतर्गत केलेल्या कारवाईत ४१ तडीपार आरोपींना पकडले आण्िा त्यांच्याविरोधात कारवाई केली. पोलिसांच्या धरपकडदरम्यान ३७ जणांवर अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणी कारवाई करत अटक करण्यात आली. कोर्टाकडून वॉरंट जारी करून १०२ जणांना अटक करण्यात आली.

    ५० भिकाऱ्यांवर कारवाई

    मुंबईत रस्त्यावर भिक मागणे अवैध असून त्यानुसार नियमितरित्या कारवाई केली जाते. सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी मुंबई शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी धाडसत्र मारले. यावेळी पोलिसांनी रस्त्यांवरील भिकाऱ्यांवरही कारवाई केली. सुमारे ५० जणांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे ११२ फेरिवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.