पोलिस आणि पालिकेचे सार्वजनिक गणेशउत्सवाना जाच, उत्सव साजरा करायचा की नाही गणेशभक्तांचा सवाल

राज्य सरकारने काही नियमावली जाहीर करत सार्वजनिक गणेशाेत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान एकीकडे, जाहीर केलेल्या नियमावलीनुसार उत्सव साजरा करण्याची सार्वजनिक मंडळांनी तयारीही दर्शवली आहे, तर दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवर पालिका वाॅर्ड व पाेलीस यांच्यात समन्वय नसल्याने दाेन्ही प्रशासनाकडून वेगवेगळ्या नियमावली पुढे केल्या जात आहेत. ज्यामुळे गणेश उत्सव मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

  मुंबई : येत्या काही दिवसात लाडक्या बाप्पाचं आगमन हाेणार आहे. गेल्यावर्षी काेराेना प्रादुर्भाव व काेराेना निर्बंधामुळे सार्वजनिक गणेशाेेत्सव साजरा करण्यात आला नव्हता. यामुळे बाप्पाच्या उत्सवावर विरजण पडलं हाेतं. पण यंदा कराेनाची दुसरी लाट ओसरत आली आहे शिवाय काेराेना निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारने काही नियमावली जाहीर करत सार्वजनिक गणेशाेत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे.

  दरम्यान एकीकडे, जाहीर केलेल्या नियमावलीनुसार उत्सव साजरा करण्याची सार्वजनिक मंडळांनी तयारीही दर्शवली आहे, तर दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवर पालिका वाॅर्ड व पाेलीस यांच्यात समन्वय नसल्याने दाेन्ही प्रशासनाकडून वेगवेगळ्या नियमावली पुढे केल्या जात आहेत. ज्यामुळे गणेश उत्सव मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

  यंदा सार्वजनिक गणेशाेत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन त्यानंतरचे ११ दिवस गणेशाेत्सव साजरा करण्याबाबत व काेराेनाच्या नियमांचे पालन करत विविध कार्यक्रम मंडळाकडून आखले जात आहे. पण बाप्पाचे आगमन नियम व अटी शर्थींमध्ये अडकलेले दिसून येत आहे.

  सार्वजनिक गणेशाेत्सवांसाठी राज्य सरकारने आखलेल्या नियमांवलीमध्येच गणेशाेत्सव साजरा करण्याबाबत मंडळांकडून सांगण्यात आले आहे. पण पालिका व पाेलीस या दाेन्ही प्रशासनाच्या समन्वया अभावी मंडळांना विविध त्रासाला सामाेरे जावे लागत आहे. राज्य सरकारच्या नियमावलीच्या पलीकडे जात नवीन नियम मंडळांसमाेर ठेवण्यात येत आहे. यात पालिका प्रशासनाकडून व्यावसायिक जाहिरातींना नियमांच्या चाैकटीत परवानगी दिली गेली असतानाही वाॅर्ड स्तरावर ती नाकारण्यात येत आहे. परवानगी देताना महापािलकेतर्फे नियमानुसार मंडळांकडून हमीपत्र लिहून घेतले जात असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशाेत्सव समन्वय समितीचे म्हणणे आहे.याव्यतिरिक्त शहरातील काही ठिकाणी पाेलिसांकडूनही वेगळे हमीपत्र मंडळांकडून लिहून घेतले जात असल्याचा आराेप समन्वय समितीने केला आहे.
  बाॅक्स

  पाेलीस, वाॅर्ड यांचा समन्वय अभाव गणेशभक्तांमध्ये नाराजी

  उपनगरातील साकीनाका पाेलीस ठाण्यातील सर्व सार्वजनिक गणेशाेत्सव महडळांना वेगळंच हमीपत्र देण्यात आले आहे. यामध्ये हार, फुल इ. अर्पण करणार नाही असे नमूद केले आहे. यामुळे साकीनाका परिसरातील मंडळांमधून नाराजीचा सूर उमटत आहेत. काेविडच्या नियमांचे पालन करत बाप्पाचे मंडप उभारण्याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे, हा तिढाही सुटत नसल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे.

  या निर्णयांवर अद्यापही निर्णय नाही?

  सुरक्षित अंतर ठेवून की केवळ ऑनलाईन दर्शनाची परवानगी ?
  आरतीसाठी जाहीरातींना पालिकेची परवानगी असताना पोलीसांचा विराेध का?
  काही ठराविक पाेलीस स्थानकांमधून हमीपत्रासाठी हट्ट का?
  हार, फुले, प्रसाद आणण्यासाठी परवानगी आहे का?
  विसर्जनासाठी महापालिकेकडून १० जणांना परवानगी असताना पाेलीसांचा विराेध का?

  समन्वय अभावी मंडळे उत्सवातून माघार घेण्याची शक्यता ?

  राज्य सरकारने नियमावली जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर पालिका, पाेलीस प्रशासनाकडून वेगळ्या नियमावली जाहीर करणे याेग्य नाही. सरकारच्या नियमांच्या चाैकटीत उत्सव साजरा करण्याची हमी दिल्यानंतर अश्या पध्दतीने मंडळांवर दबाव टाकला जात असल्यामुळे अनेक मंडळांमधून नाराजीचा सूर उमटत आहे शिवाय उत्सवातून मंडळे माघार घेण्याच्या निर्णयात असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशाेत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी सांगितले.