chandrakant patil

जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामे करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचे आणि केले जात आहे. असे ट्वीट करून भाजपने अनिल देशमुखांवर भडीमार केला आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारने पोलिस दलात केलेल्या फेरबदलावर भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसायला तयार नाही. भाजपने ट्वीटद्वारे जोरदार टीकास्त्र सोडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

    जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामे करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचे आणि केले जात आहे. असे ट्वीट करून भाजपने अनिल देशमुखांवर भडीमार केला आहे.

    कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही भाजप लावून धरत आहे. पूजा चव्हाण प्रकरण, अँटिलिया स्फोटके प्रकरण, मनसुख हिरण प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारला घेरणार्‍या भाजपने एक ट्विट करत ठाकरे सरकारचा उल्लेख हुकुमशाही ठाकरे सरकार असा केला आहे.

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपाने प्रश्नांची भडीमार केला आहे. वाझेंची नेमणूक चालवून घेतलीत, आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही सांगितल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली का? हिरेन यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझेंवर काहीच कारवाई झाली नाही. एनआयए- चौकशी सुरू होईपर्यंत वाझेंना सांभाळून घेण्याचे आदेशच होते का? इतके भयंकर कट रचणार्‍याच्यांच हाती तपास चोराच्या हातीच चाव्या देण्याइतके मजबूर का झालात गृहमंत्री? पोस्टमार्टेमचा रिपोर्ट, वाझेंचा कथित सहभाग, हिरेन यांच्या पत्नीचे आरोप या सगळ्यानंतर वाझेंच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते. पण तसे का झाले नाही? वाझेंना ज्या अदृश्य शक्तींनी संरक्षण दिले होते, त्यांच्याच इशार्‍यावर एटीएस काम करते आहे. गृहखाते तुमच्याकडे खरोखरच आहे की तुम्ही फक्त नामधारी? उत्तर द्याल अनिल देशमुख? असे प्रश्न भाजपाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारण्यात आले आहेत.

    राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.