पोलीस निरीक्षक सुनील माने पोलीस खात्यातून बडतर्फ; मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि एन्टेलिया स्फोटक प्रकरण

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याला काही दिवसांपूर्वी पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस अधिकारी रियाझ काझी याच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली. तोच कित्ता गिरवत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज भारतीय राज्यघटनेच्या कलम 3(११)  (२) (बी) अंतर्गत विशेषधिकार वापरून पोलीस निरीक्षक सुनील माने यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जारी केले.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सध्या अटकेत असलेले  पोलीस निरीक्षक सुनील धर्मा माने  यांना आज पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले.

    वाझे, काझीच्या मार्गाने माने

    अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याला काही दिवसांपूर्वी पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस अधिकारी रियाझ काझी याच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली. तोच कित्ता गिरवत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज भारतीय राज्यघटनेच्या कलम 3(११)  (२) (बी) अंतर्गत विशेषधिकार वापरून पोलीस निरीक्षक सुनील माने यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जारी केले.

    वाझेला सुनील मानेने मदत केली

    मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला सुनील माने याने मदत केली होती . विशेषत : मनसुख हिरेनला वाहनातून रेतीबंदरपर्यंत नेताना त्या वाहनाला  माने यांनी सुरक्षा पुरविल्याचा एनआयएला संशय आहे .काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना एनआयएने अटक केली होती .विषेश म्हणजे एनआयएच्या पथकाने माने यांना रेती बंदर येथे नेऊन त्याठिकाणी शोध मोहिम राबवली होती. त्यापूर्वी सुनिल माने हे  मुंबईच्या कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.