चुकीला माफी नाही…पोलिसांना एक चूक पडू शकते महागात, मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांचा इशारा

मुंबईचे पोलीस आयुक्त इकबाल सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागेवर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या वर्णी करण्यात आली. परंतु मुंबईतील गुन्हेगारीचा आढावा हेमंत नगराळे यांनी घेतल्यानंतर चांगल्या पोलिसांवर भर देण्यासोबतच त्यांची कुठलीही चूक माफ केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

    मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ सुरू झाली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त इकबाल सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागेवर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या वर्णी करण्यात आली. परंतु मुंबईतील गुन्हेगारीचा आढावा हेमंत नगराळे यांनी घेतल्यानंतर चांगल्या पोलिसांवर भर देण्यासोबतच त्यांची कुठलीही चूक माफ केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

    मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे, सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निकेत कौशिक, वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्यासह सर्व अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मुंबईतल्या घडामोडींचा आढावा घेत, महिला, ज्येष्ठ नागरिकांसंबंधीत गुन्ह्याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी नगराळे यांनी दिल्या.

    रस्त्यावरील गुन्हेगारी, क्राईम रेट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. कुठल्याही प्रकरणात कसूर होता कामा नये, छोट्यातली छोटी चूकही सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.