सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेची दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्माच्या सांताक्रूझ येथील घरावर पोलिसांची धाड

करुणा शर्मा यानी परळीत पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. आपल्याला काही धक्कादायक गोष्टी माध्यमांसमोर मांडायच्या असल्यामुळे आपण पत्रकारांना पाचारण करत असून सर्वांसमोर काही गोष्टी जाहीरपणे मांडणार असल्याचे करुणा शर्माने जाहीर केले. मात्र ही पत्रकार परिषद होण्यापूर्वी जातीवाचक शिविगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली परळी पोलिसांनी करुणा शर्माला अटक केली होती.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी असण्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्माच्या घराची पोलिसांनी झडती घेतली आहे. त्यांच्या कारमधून एक रिव्हॉल्व्हर सापडल्यानंतर सध्या शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत.

    करुणा शर्मा यानी परळीत पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. आपल्याला काही धक्कादायक गोष्टी माध्यमांसमोर मांडायच्या असल्यामुळे आपण पत्रकारांना पाचारण करत असून सर्वांसमोर काही गोष्टी जाहीरपणे मांडणार असल्याचे करुणा शर्माने जाहीर केले. मात्र ही पत्रकार परिषद होण्यापूर्वी जातीवाचक शिविगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली परळी पोलिसांनी करुणा शर्माला अटक केली होती.

    करुणा शर्माला अटक केल्यानंतर तिच्या कारमधून एक रिव्हॉल्व्हर सापडल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी शर्माच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी धाड टाकून घराची झडती घेतली. बुधवारी पोलिसांनी धाड टाकून झडती घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत कुठलेही अधिक तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिला आहे.