खारघर डोंगरात अडकलेल्या ११६ जणांची सुखरूप अग्निशामक दलाच्या मदतीने पोलिसांनी केली सुखरूप सुटका

पोलीस प्रशासनानं केलं आवाहन धुडकावून लावत खारघर डोंगरावर फिरायला जाणाऱ्या हुल्लड पर्यटकांमुळे प्रशासनाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  पर्यटक स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याची भावना पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

    मुंबई: मुंबईसह उपनगरात दोन दिवसापासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळं जनजीवनपूर्णपने विस्कळीत झाली असून रस्ते जलमय झाल्याचे दिसून येत आहे. अशातच खारघर डोंगरावर फिरायला गेलेल्या ७८ महिला व ५ मुलांची पोलिसांनी फायब्रिग्रेडच्या मदतीनं सुखरूप सुटका केली आहे.

    गोल्फ कोर्सच्या मागील नाल्यास पावसाने अचानक वाढ झाल्याने डोंगरात फिरावयास गेले ११६ जण पलिकडे अडकल्याची माहिती खारघर पोलिस ठाण्यांत मिळाल्याने फायर ब्रिगेड च्या जवानांचे साह्याने सर्वाना सुखरूप बाहेर काढले.

    पोलीस प्रशासनानं केलं आवाहन धुडकावून लावत खारघर डोंगरावर फिरायला जाणाऱ्या हुल्लड पर्यटकांमुळे प्रशासनाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  पर्यटक स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याची भावना पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. यापुढे डोंगरात आढळुन आल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही खारघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिला आहे.