Police alert on the backdrop of a rainy convention 'Operation Allout' in Mumbai

कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी(Traffic jam) होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त(Police Security For Ganeshotsav) ठेवण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse Patil) यांनी याविषयीच्या सूचना दिल्या आहेत.

    मुंबई: गणेशोत्सवासाठी(Ganeshotsav 2021) चाकरमानी कोकणात जात आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी(Traffic jam) होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त(Police Security For Ganeshotsav) ठेवण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse Patil) यांनी याविषयीच्या सूचना दिल्या आहेत.

    कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलीसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

    दिलीप वळसे-पाटील यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतली होती. या बैठकीस ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, परिवहन, एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदींचे वरिष्ठ अधिकारी तसेच पथकर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची आणि सुविधांची माहिती यावेळी दिली.

    कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज,शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशभक्तांना टोल माफ करण्यात आला आहे.