सचिन वाझेंना पोलिसांनी नेलं अँटालिया इमारतीपाशी, पुन्हा घडवला क्राईम सीन, तपासाची चक्रं वेगवान

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयची टीम पेडर रोडवरील फइमारतीपाशी घेऊन गेली. त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाचं रिक्रिएशन करण्यात आलं. म्हणजेत त्या दिवशी जशा घटना घडल्या, तशाच घटना पुन्हा जाणीवपूर्वक घडवण्यात आल्या. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील, अशी एनआयएला अपेक्षा आहे. सचिन वाझे त्या दिवशी जेव्हा स्फोटकांनी भरलेल्या गाडीजवळ पोहोचले, तेव्हा परिस्थिती कशी होती आणि त्यानंतर नेमकं काय घडलं, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी यावेळी केला.

    प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया इमारतीच्या जवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्याप्रकरणी एनआयएकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी नेमकं काय घडलं, याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. यासाठी स्फोटकांनी भरलेल्या गाडीपाशी सर्वात अगोदर पोहोचलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी नेण्यात आलं.

    वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयची टीम पेडर रोडवरील फइमारतीपाशी घेऊन गेली. त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाचं रिक्रिएशन करण्यात आलं. म्हणजेत त्या दिवशी जशा घटना घडल्या, तशाच घटना पुन्हा जाणीवपूर्वक घडवण्यात आल्या. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील, अशी एनआयएला अपेक्षा आहे. सचिन वाझे त्या दिवशी जेव्हा स्फोटकांनी भरलेल्या गाडीजवळ पोहोचले, तेव्हा परिस्थिती कशी होती आणि त्यानंतर नेमकं काय घडलं, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी यावेळी केला.

    ही गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर हिरेन यांचा मृतदेह वसईच्या खाडीत सापडला होता. हिरेन यांच्या मृत्युशी सचिन वाझेंचा जवळचा संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर तपासाची सूत्रं वेगाने हलायला सुरुवात झाली होती.

    मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं दिलेल्या जबाबानुसार सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात गेल्या काही महिन्यात अनेक व्यवहार झाल्याचं स्पष्ट होत असल्याचं फडणवीस म्हणाले होते. अनेकदा मनसुख आणि वाझे यांच्या भेटी झाल्याची माहिती मनसुख यांच्या पत्नीने दिली आहे. मनसुख यांची गाडीदेखील वाझेंकडे असल्याची माहिती नोंदवण्यात आलीय. तर सचिन वाझेंनी मनसुख यांना अटक होण्याचा सल्ला दिला होता आणि लवकरच जामीनावर सुटका करण्याचं आश्वासनही दिलं होतं, असं मनसुख यांच्या पत्नीनं जबाबात नोदंवल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. या क्राईम सीन रिक्रिएशनमधून पोलिसांच्या हाती काय नवे तपशील लागतात, याची उत्सुकता आहे.