पोर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्राला अखेर जामीन; ५० हजारांच्या जातचुलक्यावर अटीशर्तीसह जामीन मंजूर

पॉर्नोग्राफी चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला उद्योगपती राज कुंद्राला सोमवारी मुंबई मुख्य महादंडाधिकारी न्यायालयाने दिलासा देत ५० हजारांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला. कुंद्रासह त्याचा आयची प्रमुख रायन थॉर्पोलाही न्यायालयाने जामीन दिला आहे.

    मुंबई : पॉर्नोग्राफी चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला उद्योगपती राज कुंद्राला सोमवारी मुंबई मुख्य महादंडाधिकारी न्यायालयाने दिलासा देत ५० हजारांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला(Raj Kundra finally granted bail). कुंद्रासह त्याचा आयची प्रमुख रायन थॉर्पोलाही न्यायालयाने जामीन दिला आहे.

    अश्लील चित्रपटांना पैसे पुरवण्याच्या आणि इंटरनेटवर अपलोड करण्यात सक्रिय सहभागाप्रकरणी मुंबई पोलिसांनी व्यावसायिक राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक केली. त्याविरोधात कुंद्राने सत्र आणि उच्च न्यायालयात दरवाजा ठोठावत जामीनासाठी अरज दाखल केला होता. मात्र, त्याचा अर्ज दोन्ही न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर नुकतेच मुंबई पोलिसांनी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात उद्योगपती राज कुंद्रासह अन्य दोघांवर सुमारे दिड हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर आता राज कुंद्राने मुख्य महादंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

    सदर प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात आले असून कथित आक्षेपार्ह चित्रपट निर्मीतीत आपला थेट सहभाग असल्याचा आरोपपत्रात उल्लेख नसल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला होता. सदर प्रकणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले असून सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या एफआय़आरमध्ये आपले नाव नव्हते त्यानंतर ते दाखल करण्यात आले असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. सदर याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थॉर्पोला ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कुंद्राची उद्या (मंगळवारी) कारागृहातून सुटका होणार आहे.

    पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभाग घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोन अभिनेत्रींना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ६ ऑक्टोबरपर्यंत तूर्तास दिलासा दिला आहे. अटकपूर्व जामीनासाठी दोघींनी न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणी राज कुंद्रा आणि उमेश कामत नामक अन्य एका आरोपीलाही न्यायालयाने दिलेला दिलासा पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवला आहे.