मुख्य लिपिक पदाची परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्याची शक्यता; आता महापालिकाच प्रादुर्भाव वाढवते आहे

मुख्य लिपिक पदाची परीक्षा शिवडी, ताडदेव, करी रोड अशा तीन केंद्रावर होणार आहे. त्या परीक्षेत सुमारे २,७०० लिपिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे करोना असतानाही इतक्या मोठ्या स्तरावर परीक्षा घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  मुंबई : मुंबईत कोरोना वाढू लागल्याने राज्य सरकार, पालिकेने तातडीने महिन्याभराचा कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, पालिकेनेच त्या नियमांना अपवाद करत १६ ते १८ एप्रिल कालावधीत विभागांतर्गत मुख्य लिपिक पदासाठी परीक्षा घेतली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मुख्य लिपिक पदासाठीच्या परीक्षेविषयी पालिका प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे, ही परीक्षा तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

  मुंबई पालिकेतील विविध विभागात कार्यरत असलेल्या लिपिकांना मुख्य लिपिक पदाच्या परीक्षेची संधी उपलबध्द केली जाते. त्यामुळे, पालिकेतील लिपिकांना त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुख्य लिपिक होण्याचा मार्ग खुला असतो. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता पालिकेने १६ ते १८ एप्रिल कालावधीत आयोजित केलेल्या परीक्षेविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

  मुख्य लिपिक पदाची परीक्षा शिवडी, ताडदेव, करी रोड अशा तीन केंद्रावर होणार आहे. त्या परीक्षेत सुमारे २,७०० लिपिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोरोना असतानाही इतक्या मोठ्या स्तरावर परीक्षा घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  एकीकडे, राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधांचा विचार करताना पालिकेने अजूनही मुख्य लिपिक पदाची परीक्षा का पुढे ढकलली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही परीक्षा काही दिवसांनी घेतली तरीही चालण्यासारखे असताना इतकी घाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यातील कोरोनाचा स्थिती पाहता ही परीक्षा तात्काळ रद्द करून ती पुढे ढकलण्याची मागणी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सरचिटणीस रवींद्र सूर्यवंशी यांनी पालिकेकडे केली आहे. मुंबईत कोरोना निर्बंध असताना पालिकेकडून याप्रकारे परीक्षा घेता येते का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

  काही लिपिक कोरोनाबाधित?

  पालिकेतील काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून त्यात ‘एल’ विभागातील परीक्षार्थी असलेल्या एका लिपिकास कोरोना झाल्याचेही सांगितले जाते.