Narayan Rane vs Shiv Sena; रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, शिवसेनेच्या बालेकल्ल्यात नारायण राणे मागणार आशिर्वाद

नारायण राणे शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू करत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसाची ही यात्रा असेल. त्यामुळं शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाचा दुसरा अंक पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरु ठेवण्याचा चंग भाजपा आणि नारायण राणे यांनी बांधला आहे. त्यामुळे कोकणात खास करून नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष तीव्र होऊ शकतो.

  मुंबई : भाजपाची जन आशीर्वाद यात्रा सुरु असताना रायगड येथे नारायण राणेंनी मुख्यमंत्र्याविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांनतर नारायण राणेंना झालेली अटक मग जामीन हे सात तास चाललेलं “हायव्होल्टज” नाट्य महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले. बुधवारी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत आपण कुणाला भीक घालत नाही, मी सर्वांना पुरुन उरलोय, भविष्यात पाऊल जपून टाकेन असं म्हटलेय, पण शुक्रवारपासून जन आशीर्वाद यात्रा सुरु होईल असं सुद्धा राणेंनी यावेळी माध्यमांना माहिती दिली.

  नारायण राणे उद्यापासून जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू करत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसाची ही यात्रा असेल. त्यामुळं शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाचा दुसरा अंक पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरु ठेवण्याचा चंग भाजपा आणि नारायण राणे यांनी बांधला आहे. त्यामुळे कोकणात खास करून नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष तीव्र होऊ शकतो.

  नारायण राणे तिसऱ्या टप्प्यात तीन दिवसाची जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. त्यातील दोन दिवस सिंधुदुर्गमध्ये असतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्याचा भाजपचा इरादा आहे. एकीकडे भाजपनं जन आशीर्वाद यात्रा सुरु ठेवण्याचा निर्धार केला असतानाच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलय.

  नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भर संसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही ‘वर आमचे सरकार आहे. महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?’ अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात.

  शिवसेनेनं सामनातून जुनी प्रकरणं उकरुन काढण्याचा इशारा दिल्यानंतर नितेश राणेही आक्रमक होत टिव्टच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊतांवर टिकास्त्र सोडले आहे. स्व. मॉंसाहेब यांच्याविषयी संजय राऊत यांनी याआधी लोकप्रभामध्ये काय लिहिले आहे ते वाचावे, ज्या संजय राऊतांना स्वत:चा बाप माहित नाहिय, त्यांना काय किंमत द्याची अशी बोचरी आणि घणाघाती टीका नितेश राणेंनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. तसेच आपल्या वडिलांना म्हणजे नारायण राणेंना अटक झाल्यानंतर याचा ‘करारा जवाब मिलेगा’ असा एक व्हीडिओ शेअर करत शिवसेनेला आव्हान दिले आहे.

  राणे आणि शिवसेना ऐकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळं आता ही लढाई प्रत्यक्ष मैदानात सुरु झाली आहे. नारायण राणेंना अटक करून शिवसेनेने आपला पूर्वीचा राणेंच्या वरील राग काढत, संघर्षाला धार दिली. त्यानंतर आता भाजप आणि राणे कुंटुबीय मुख्यमंत्री किंवा शिवसेना हे कधी कुठे सापळ्यात सापडतील या संधीची वाट पाहत आहेत. आता या दोघांमधील संघर्ष भविष्यात आणखी कुठली वळणं घेतो, आणि कोणते राजकीय भूकंप घडवून आणतो ते पाहणे औत्सकतेच असणार आहे.